21/12/2012

कोणी काय शोधलं गुगलवर...

बघता बघता २०१२ संपत आलं , या वर्षात बऱ्याच घटना घडल्या मग ते अण्णा हजारेंच उपोषण असो किंवा असीम त्रिवेदिनी काढलेलं व्यंगचित्र . जश्या घटना घडल्या तसं लोक इंटरनेटवर त्याबद्दल अजून काही मिळेल म्हणून शोधत गेले .
भारतीयांनी यावर्षी गुगलवर काय शोधलंय याची जणू यादीच केली आहे गुगलने .ही यादी अशी आहे ..

सर्वात जास्त भारतीयांनी शोध घेतला तो म्हणजे बँकिंग परीक्षाच , गेट परीक्षाच आणि सनी लेओनचा . यानंतर चौथ्या नंबरला आहे हिंदी चित्रपट 'एक था टायगर' आणि पाचव्या नंबरला 'राउडी राठोड' .

सर्वात जास्त शोधले गेलेले ५ लोकं असे आहेत
१. सनी लेओन
२.राजेश खन्ना
३. पुनम पांडे
४. अलिया भट्ट
५, निर्मल बाबा
सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या पहिल्या १० लोकांमध्ये 'विलासराव देशमुख' यांचा देखील समावेश आहे .

सर्वात जास्त शोधले गेलेले ५ हिंदी चित्रपट असे आहेत ,
१. एक था टायगर
२. राउडी राठोड
३. जन्नत २
४. हाउसफुल्ल २
५. राझ ३
या पाठोपाठ 'जिस्म  २' आणि 'बर्फी' या चित्रपटांचा नंबर लागतो .

पहिले पाच सर्वात जास्त शोधले गेलेले पर्यटनस्थळे ,
१. केरळ
२. ताजमहाल
३. वाघा बोर्डर
४. वैष्णवी देवी
५ . अमरनाथ
पहिल्या १० पर्यटनस्थळा मध्ये शिर्डीचा देखील समावेश आहे .

सर्वाधिक शोधले गेलेले ५ शहरे आहेत ,
१. दिल्ली
२. बंगळुरू
३. मुंबई
४. चेन्नई
५. पुणे

याचबरोबर सेंसेक्स , विलासराव देशमुख याचं निधन , अण्णा हजारें , असीम त्रिवेदिनी काढलेलं व्यंगचित्र , किंगफिशर , प्रणब मुखर्जी , राजेश खन्ना याचं निधन याबद्दल देखील भारतीयांनी शोध घेतला आहे .

तुम्ही ही संपूर्ण यादी या लिंकवर बघू शकता .

20/12/2012

फेसबूकला असतात तीन पासवर्ड ...!

फेसबूकला तीन पासवर्ड असतात हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच झाला असाल , हो पण हे खरं आहे. आता हे तीन पासवर्ड कोणते ते जाणून घेऊ

१ . पहिला पासवर्ड हा तुमचा साधा पासवर्ड जो तुम्ही फेसबूकवर लॉगीन होण्याकरता  कायम वापरतात . आपण असे गृहीत धरू की तुमचा साधा पासवर्ड आहे maha .  

२. दुसरा पासवर्ड हा तुमच्या पहिल्या पासवर्ड सारखाच असतो परंतु त्याचे पहिले अक्षर हे कॅपिटल असते . म्हणजे जर तुमचा साधा पासवर्ड  maha असेल तर तुमचा दुसरा पासवर्ड असेल Maha .

3. तिसरा पासवर्ड हा प्रत्येक शब्दाची रूप (capital चे  Small आणि Small चे  Capital  ) बदलून तयार केलेला असतो , म्हणजे जर तुमचा साधा पासवर्ड  maha असेल तर तुमचा तिसरा पासवर्ड असेल MAHA  .
facebook password

तीन पासवर्ड का असतात ?
 फेसबूकला तीन पासवर्ड असतात कारण
 १. काही मोबाईल पहिलं अक्षर हे कॅपिटलच स्वीकारता आणि
२. पासवर्ड टाकतांना कॅप्स लॉक (Caps Lock) चालू असला तर युजर्सचा पासवर्ड चुकू शकतो

आता तुम्हाला हे पडताळून घ्यावयाचे असल्यास तुम्ही तुमच्या फेसबूक खात्यावर लॉगीन करू शकता .

19/12/2012

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

मराठी संकेतस्थळांना प्रोत्साहन देण्याकरता मराठी विकास संस्थेने संकेतस्थळांची स्पर्धा आयोजित केली आहे . ही स्पर्धा यावर्षी शासकीय संकेतस्थळे आणि इतर संकेतस्थळे अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे ह्या गटांनुसार पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील.

 शासकीय संकेतस्थळे
पारितोषिक          रुपये      
पहिले                  १५,०००
दुसरे                    १०,०००      
तिसरे                  ५,०००                      

इतर संकेतस्थळे 
पारितोषिक          रुपये      
पहिले                  ३५,०००
दुसरे                    २०,०००         
तिसरे                  १५,०००

दि. १८/१२/२०१२ पासून दि. १८/०१/२०१३ ह्या कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशपत्रिका संपूर्ण भरून स्पर्धेतील सहभाग नोंदवायचा आहे.

संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डडर्स), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावतपणा, वापरकर्त्यांना सहभागाची सोय (इण्टरअ‍ॅक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.

ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे नियम आणि अटी पुढीलप्रमाणे असतील.

०१. ही स्पर्धा मराठी संकेतस्थळांची आहे. स्पर्धेत सहभागासाठी नोंदवण्यात येणारे संकेतस्थळ हे मुख्यत्वे मराठी भाषेत असावे. ते बहुभाषिक असल्यास त्यात मराठीभाषेतील माहिती ही इतर भाषांतील माहितीच्या समप्रमाणात असावी. मराठीत मजकूर नसलेल्या संकेतस्थळांचा ह्या स्पर्धेत समावेश होणार नाही.

०२. ह्या स्पर्धेत अनुदिन्या (ब्लॉग), चर्चापीठे (फोरम्) ह्यांचा समावेश करण्यात येणार नाही.

०३. स्पर्धेच्या प्रवेशअर्जातील मागितलेली संपूर्ण माहिती भरण्यात यावी. अपुरी माहिती असलेल्या संकेतस्थळांचा समावेश स्पर्धेत करण्यात येणार नाही.

०४. राज्य-मराठी-विकास-संस्थेच्या वतीने ह्यापूर्वी २००६, २०१० आणि २०१२ ह्या वर्षांत संकेतस्थळाची स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत पुरस्कार मिळालेल्या संकेतस्थळांना ह्या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

०५. संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डर्ड्स्), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, संकेतस्थळावरील सामग्रीची उपयुक्तता, अद्ययावतता, वापरकर्त्यांच्या सहभागाची सोय, माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा इ. निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.

 ०६. युनिकोड संकेतप्रणाली वापरून तयार केलेल्या संकेतस्थळांना स्पर्धेत प्राधान्य देण्यात येईल. ०७. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

नोंदणीसाठी प्रवेशअर्ज येथे बघा

स्रोत : मराठी विकास संस्था